तालुका

माणगाव येथे अखिल बुरुड समाज प्रतिष्ठानचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

 

नितीन बडे – तालुका प्रतिनिधी माणगाव 

 

रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी मानस बॅकेट हाॅल, माणगांव येथे प्रथमच भव्य दिव्य असा नेत्रदिप बुरुड समाज मेळा धोल – ताशांच्या गजरात रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांच्या हस्ते उद्घाटन व चंद्रपूरचे आमदार व समाज भुषण मा.श्री.किशोरभाऊ जोरगेवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगांव व महाराष्ट्रातुन आलेल्या बुरुड समाज बांधव यांच्या भरघोस प्रतिसादात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमात जेष्ठ नागरीक यांचा सन्मान म्हणुन छत्री, 10 वी 12 वीतील 90 % पेक्षा जास्त गुण विद्यार्थी यांचा विशेष गौरव, 1 ते 5 वी दफ्तर- वही, 6 ते 9 वी, उच्च शिक्षित तरुण यांचा विशेष सत्कार तसेच नगरसेवक,उद्योजक,प्रतिष्ठीत व्यक्तींनी केलेल्या विशेष सहकार्याबदद्ल त्यांचा समाज भुषण पुरस्कार देवुन विशेष सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमास उद्योजक सदानंद गायकवाड(उरण), उद्योजक व निवृत्त पोलिस सहाय्यक अधिक्षक प्रदीप माने (पनवेल) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. महाराष्ट्रातुन आलेल्या नागपुर, चंद्रपूर कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, पनवेल, ठाणे, खेड, चिपळूण, दापोली आणि रायगड येथील समाज बांधव यांचा विशेष सन्मान संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब पवार, महासचिव प्रकाश माने, खजिनदार राजेंद्र नागे, जिल्हा प्रमुख संदिभाई नागे, तालुका प्रमुख संदेश महाले यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रम भव्य दिव्य व यशस्वी करण्यात संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष, शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक प्रमुख डाॅ. अजय आत्माराम मोरे, महिला आघाडी अंकीता अजय मोरे आणि सहकारी टिम यांनी प्रचंड व विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!