तालुका

जिल्हा परिषद सदस्य सुरेश गणपत कालगुडे यांच्या हत्येप्रकरणे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

माणगाव न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर 

रायगड: जिल्हा परिषद सदस्य सुरेश गणपत कालगुडे यांच्या हत्येप्रकरणे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. माणगाव न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, सदरची घटना महाड एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजे महाड एम.आय.डी.सी. येथील जुहारी कंपनीतील रस्त्यावर दि . ३१ डीसेंबर २०१८ रोजी रात्री ०१.३० वाजण्याच्या सुमारास घडला होता. सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, सदर घटनेतील आरोपीत शिवपती सुभोगलाल पटेल कंटेनरचालक यांनी आपले ताब्यातील कंटेनर क एम.एच. ४६ / बीबी ५४८२ हा दारू पिवून चालवून यांतील फिर्यादी भारत मोहन कदम यांचे अंगावर कंटेनर घालून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून यांतील मयत सुर्यकांत उर्फ सुरेश गणपत कालगुडे यांच्या अंगावर कंटेनर घालून त्यात त्यांना गंभीर , दुखापत होवून त्यास ठार मारले, सदर घटनेची फिर्याद पोलीसानी घेतली, भा.द.वि.सं. कलम ३०२,३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा तपास श्री ए.ए. पाटिल , सहा. पोलिस निरीक्षक महाड एम.आय.डी.सी. पोलिस ठाणे यांनी केला. सदर खटल्याची सुनावणी मा. अति. सत्र न्यायाला, माणगाव रायगड येथे झाली सदर खटल्यामध्ये अति. जिल्हा शासकिय अभियोक्ता जितेंद्र डी. म्हात्रे यांनी फिर्यादी पक्षाच्या वतीने महत्वपूर्ण काम पाहिले. सदर केसकामी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासण्यात आले. प्रभावी युक्तिवाद करतांना सरकारी वकील अॅड . जितेंद्र द . म्हात्रे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी यु.एल. धुमास्कर, शशिकांत कासार , पोह / ९ १३ , छाया कोपनर , मपोह १०२ व पोहवा / ८७ ९ शशिकांत गोविलकर ांनी सहकार्य केले . मा . टी एम . जहांगिरदार , अति सत्र न्यायाधिश , माणगांव – राड यांनी सदर घटनेतील गुन्हयाच्या शाबीतीनंतर आरोपी शिवपती सुभोगलाल पटेल या आरोपींना दोषी ठरवून दि . ०२/१२/२०२२ रोजी भा.द.वि.क. , ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व रू .२०,००० / – दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा , भा.द.वि.क. ३०७ अन्वये १० वर्ष सक्तमजूरी व रू . ५००० / – दंड व दंड न भल्यास १ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!