ब्रेकिंग

ओमायक्रॉन: मोदी सरकार घेणार मोठा निर्णय? अजित पवारांनी दिले संकेत

सोहम जाधव – शहर प्रतिनिधी रोहा

डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन हा करोनाचा नवा विषाणू तिपटीने अधिक संसर्गजन्य असल्याने केंद्र सरकार दक्ष झाले आहे. करोना संदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी तसेच आरोग्य सुविधांच्या सुसज्जतेच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा बैठक ही बोलावली आहे. या बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेजाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या बैठकीच्या आधीच मोदी सरकार सध्या राज्यांसोबत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. इतकच नाही तर केंद्र सरकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी महाराष्ट्रच्या विधनासभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात करोना परिस्थितीचा संदर्भ देताना दिलेत.

याचसंदर्भात बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला. हा उल्लेख करतानाच त्यांनी केंद्र सरकार सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाईट लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याचं म्हटलंय. “स्वत: देशाचे पंतप्रधान देखील जे कायसध्या करोनाच्या संदर्भातील संकट आहे त्याबद्दल गांभीर्याने विचार करतायत. त्यामध्ये रात्री लॉकडाउन करण्याची चर्चा वरिष्ठपातळीवर, देश पातळीवर सुरु आहे,” असं अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!