महाड एसटी आगारातून स्मार्ट कार्डचे वाटप / एसटी सेवा पूर्व पदावर
सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
महाड: दोन वर्षे करोना महामारी आणि गतवर्षी जुलै मध्ये आलेला महापूर यामुळे महाड एसटी आगारातून ज्येष्ठ नागरीक, पत्रकार वइतर सवलत दारांना दिले जाणारे व नुतनीकरण केले जाणारे स्मार्ट कार्डचे वाटप बंद होते, मात्र सोमवार दि. २७ जून पासून हे स्मार्ट कार्डचे वाटप पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. तरी ज्यांनी सवलतीसाठी आवश्यक असणारे स्मार्ट कार्ड आवश्यक ती कागदपत्रे सादर करून घेऊन जावे असे आवाहन महाड आगार प्रमुख शिवाजी जाधव यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा कडून एसटीतून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक, पत्रकार व अपंग यांचेसाठी असणार्या सवलती करीता स्मार्ट कार्ड सुरु करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे करोना महामारी व महापूरामुळे महाड आगारातून दिल्या जाणार्या स्मार्ट कार्डचे वाटप बंद होते मात्र सोमवार दि. २७ जून पासून या स्मार्ट कार्डचे वाटप व नुतनीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिक व सवलत दारांनी हे स्मार्ट कार्ड घेतले नसेल अथवा नुतनीकरण केले नसेल त्यांनी हे कार्ड स्थानकातून सकाळी ११ ते ५ या वेळेत घेऊन जावे असे आवाहन आगार प्रमुख जाधव यांनी केले आहे.



