ब्रेकिंग

खंडित वीजपुरवठ्यामुळे गणेशमूर्तीकार हैराण

 

शरद चाफेकर – ग्रामीण प्रतिनिधी मुरुड जंजिरा

मुरुड जंजिरा: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले असून मूर्ती कार्यशाळांमध्ये रंगकाम, सजावट, मूर्तींचे पॅकिंग आदी कामांना वेग आला आहे. गणेशभक्‍तांना वेळेत मूर्ती मिळावी, यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. मात्र मुरुड जंजिरा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्‍याने मूर्तिकार हैराण झाले आहेत.

गणेशमूर्ती शाळांमध्ये जवळपास 90-95 टक्के काम पूर्ण झाले आहे. बहुतांश मूर्ती तयार असून रंगकाम, साज-शृंगार करण्यात येत आहे. या कामासाठी उजेड, विजेची आवश्‍यकता असते, मात्र वारंवार वीज खंडित होत असल्‍याने कामात व्यत्‍यय येत असल्‍याने कारागिरांनी नाराजी व्यक्‍त करीत आहेत.

गणेशमूर्तीची बारकाईने करणारी कामे धोतर रंगविणे, दागिने बसविणे, डोळ्यांचे रंग काम, हाताच्या रेषा आदी सराईतपणे केली जाणारी सजावटीची कामे बाकी आहेत. उरण परिसरात मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उलवे तसेच अनेक ठिकाणांहून गणेशभक्‍त मूर्ती घेण्यासाठी येतात.

वेळेत काम पूर्ण व्हावे, यासाठी मूर्ती कार्यशाळांमध्ये दिवसरात्र काम सुरू आहे. मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्‍याने बारकाईने केल्‍या जाणाऱ्या कामांवर परिणाम होत आहे. तालुक्‍यातील काही भागात छोटे-मोठे कारागीर असून त्‍यांना जनरेटर किंवा थोड्या दिवसांसाठी इन्व्हर्टर घेणे परवडत नाही. त्‍यामुळे त्‍यांना वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत वाट पाहावी लागते.

मुरुड जंजिरा तालुक्यामध्ये अवेळी वीज जात असल्‍याने गणेशमूर्ती कार्यशाळांना मोठा फटका बसतो आहे. त्‍यामुळे वेळेत ऑर्डर पूर्ण होईल की नाही, याची कारागिरांना चिंता आहे.

मुरुड जंजिरा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्‍याने मूर्ती कार्यशाळांमधील काम ठप्प होते. गणेशमूर्तीतील बारकाईने करण्याच्या कामासाठी विजेची, पुरेशा प्रकाशाची गरज असते. तसेच ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र काम सुरू आहे. मूर्ती तयार असल्‍या तरी सजावटीसाठी किमान वेळ अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!