ब्रेकिंग
चिपळूण – मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळून ढिकाऱ्याखाली जेसीबी अडकल्याची धक्कादायक घटना
राकेश देशमुख – शहर जिल्हा प्रतिनिधी रायगड
चिपळूण – मुंबई– गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळून ढिकाऱ्याखाली जेसीबी अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेसीबीमध्ये दोन कामगार असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, दरड खाली कोळसताना एक कामगार पळून गेल्याने तो वाचला असून दुसरा कामगाराचा या घटनेत मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. डोंगराचा काही भाग आणखी घळण्याची भिती असल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.




