ब्रेकिंग
देशात 24 तासांत 600 हून अधिक नवे कोरोनाबाधित, दोन रुग्णांचा मृत्यू
अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक
देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. देशात गेल्या 24 तासांत 600 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे. ही नवीन आकडेवारी फार चिंताजनक आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे टेन्शन वाढलं आहे. नवीन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यासोबतच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. सुट्ट्यांमुळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, त्यामुळे घेतलेल्या निष्काळजीपणामुळे चिंत वाढली आहे. पार्ट्या आणि गर्दीमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



