जय हनुमान नवेनगर क्रिकेट क्लब महाड यांच्या मार्फत भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न
राकेश देशमुख - जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड – जय हनुमान नवेनगर क्रिकेट क्लब महाड आयोजित भव्य ओव्हरआर्म गाव टू गाव क्रिकेट स्पर्धा लोकनेते स्व. आम. माणिकराव जगताप क्रीडानगरी नवेनगर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विधानसभा मतदार संघांचे नेते, रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष, रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा महाड M.I.D.C कामगार उत्कर्ष सभेचे ऊपाध्यक्ष हनुमंत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा संपन्न.
ह्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महेश शेडगे, राजू बाईत, अमर शिंदे, मुन्ना कदम, राहुल सकपाळ, बाबा शेडगे, वैभव साळवी, गणेश पोफळकर, पिंट्या साळवे, विजय भुवड इत्यादी प्रमुखांनी मेहनत घेतली.
या वेळी महाड–पोलादपुर–माणगाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस, NSUI मार्गदर्शक, प्रभारी सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी काँग्रेस कमिटी श्रीयशजी जगताप, माजी नगरसेवक शांताराम सुतार, माजी बांधकाम सभापती प्रमोद महाडिक, रायगड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जगदीश पवार, वेदांत मोरे इत्यादी उपस्थित होते.



