तालुका

वडवली १ करोड २१ लक्ष ५९ हजार रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन

ढोल ताशांच्या गजरात लेझीमच्या तालावर मिरवणूक काढत जल्लोष मय वातावरणात संपन्न

 

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

 

रायगड : माणगाव मधील गोरेगाव विभागातील वडवली ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना वडवली या योजनेचे भूमिपूजन वडवली मोहल्ला येथे दि. ८ नोव्हेंबर रोजी पार पडले.

ही योजना वडवली मोहल्ला, वडवली कोंड, वडवली बौद्धवाडी आणि वडवली गवळवाडी या संबंधित गावांना ह्या योजनेचा लाभ होणार आहे, ही योजना घर तिथे नळ अशा पद्धतीची असल्यामुळे या ग्रामपंचायत मधील महिला भगिनींनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

या वेळी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विभाग प्रमुख आणि माणगाव तालुक्यातील आणि गोरेगाव विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक आणि महिला भगिनी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!