ब्रेकिंग

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वरंध घाट दि. 01 जुलै ते दि. 30 सप्टेंबर या कालावधीत वाहतुकीसाठी बंद

स्वप्नील ढवण – उपसंपादक

कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना मार्ग असलेल्या महाड–भोर, पुणे–पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. महाड–पुणे मार्गावरील वरंध घाट पावसाळा व दरडी यामुळे धोकादायक ठरत आहे. दि. 29 जून 2022 रोजी दरड कोसळल्यानंतर पुढील धोका टाळण्यासाठी अतिवृष्टीच्या काळात वरंध घाट दि. 30 जून 2022 पासून पुढील तीन महिने अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

सध्या जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वरंध घाट क्षेत्रात दरडी कोसळण्याची भीती आहे. तसेच रस्ता खचण्याची शक्यता लक्षात घेऊन व पुढील धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दि. 01 जुलै ते दि. 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत दुरुस्तीच्या व पावसाळा कालावधीतील अतिवृष्टीच्या वेळी कुठलाही अपघात होवू नये याकरिता अवजड वाहतूकीकरिता व जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाच्या यलो, ऑरेंज व रेड इशाऱ्याच्यावेळी सर्व प्रकारच्या वाहतूकी करिता घाट रस्ता बंद ठेवण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

या मार्गावरील वाहतूक पुण्याकडे जाण्यासाठी महाड–माणगाव–निजामपूर–ताम्हिणी घाट–मुळशी–पिरंगुट–पुणे तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा–पोलादपूर–खेड–चिपळूण–पाटण–कराड–कोल्हापूर या पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याबाबतचे ही आदेश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जारी केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!