तालुका

महाड काँग्रेस पक्षाच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा

 

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड : महाड काँग्रेस पक्षाच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा आज शुक्रवार दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०८ वा. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून किल्ले रायगड चित्तदरवाजा येथून सुरु करण्यात आली आणि थेट चवदार तळे, महाड अशामार्गाने संपन्न झाली.

या पदयात्रेत नगराध्यक्ष महाड नगर परिषद & महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव स्नेहल जगताप, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. महेंद्र घरत, रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा मा. श्रध्दा ठाकूर मॅडम, रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष मा. नानासाहेब जगताप, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!