तालुका

बिरवाडी येथे सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते

सचिन चांदोरकर – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड

प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल लि. यांच्या सी एस आर फंडातून अत्याधुनिक शौचालय लोकार्पण, बिरवाडी येथील स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे रुपये ६ लक्ष २४००० हजार, बिरवाडी मधले आव्हाड येथे रस्ता व गटार बांधणे १८लक्ष ८६ हजार, वेरखोले रायकरवाडी येथे आरसीसी रस्ता ३ लक्ष १४ हजार, बिरवाडी भिमनगर येथे आरसीसी रस्ता ३ लक्ष, बिरवाडी आदर्श नगर मुख्य रस्ता गणपती मंदिर पर्यंत आरसीसी रस्ता ३ लक्ष, बिरवाडी रा.जी.प. कन्या शाळा फेव्हर ब्लॉक रस्ता २ लक्ष, बिरवाडी ओम साई नगर आरसीसी रस्ता १ लक्ष ५० हजार, बिरवाडी रा.जी. प. शाळा शौचालय बांधणे ३ लक्ष, बिरवाडी भिमनगर येथे अंतर्गत गटार बांधणे ३ लक्ष, बिरवाडी मधले आव्हाड येथे विहिरीचे सुशोभीकरण २ लक्ष ५० हजार, बिरवाडी वेरखोले येथे साकव बांधणे ३ लक्ष, इत्यादी लाखो रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज बिरवाडी ग्रामपंचायत सरपंच – उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, रा. जि. प सदस्य, प्रीव्ही कंपनीचे विनोद देशमुख, बिरवाडी ग्रामपंचायत आणि विभागातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी महिला भगिनी इत्यादी उपस्थित होते.

बिरवाडी हे या पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ असलेले ठिकाण असल्यामुळे या भागातील जनते साठी एक व्यवस्थित शौचालय असावे ही आमदार भरतशेठ गोगावले यांची अनेक वर्षांपासून ची संकल्पना पूर्ण झाल्या बद्दल आज समाधान वाटत आहे, शौचालय बांधण्यासाठी निधी तर उपलब्ध होत होताच पण बिरवाडी शहरामध्ये जागेचा अभाव होता, तो प्रश्न आज कायमस्वरूपी मार्गी लागला सदर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रिव्ही कंपनी आणि संबंधित पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि बिरवाडी करांचे आभार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!