रस्त्याचे भूमिपूजन व भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
मोरगिरी बौद्धवाडी ते निकमवाडी या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आणि मोरगिरी भंडारेवाडी व झोरेवाडी येथील शे का प पक्षातील महिला भगिनींसह सर्व ग्रामस्थांचा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी प्रवेश कर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्ही एवढ्या वर्ष शेकाप या पक्षात राहून विकास कामांपासून वंचित राहिलो आहोत आता आमदार साहेबांच्या प्रयत्नांमुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाड विधानसभा मतदारसंघात होत असलेली विकास कामे पाहून आम्ही शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहोत असे प्रवेश सांगितले.
यावेळी प्रवेश कर्त्यांचे महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी स्वागत करत आपली जी काही विकास कामे आहेत ती आम्ही नक्कीच पूर्ण करून देऊ असा आत्मविश्वास देत आपल्याला शिवसेना पक्षात सन्मानाचीच वागणूक दिली जाईल फक्त आमच्या पाठीशी एकमताने ठाम रहा मतदार संघात विकास कामे आतापर्यंत शिवसेनेच्या माध्यमातूनच आपण केली आहेत, आणि इथून पुढे देखील आपणच करणार त्याबद्दल चिंता आणि काळजी करण्याचे कारण नाही असे गोगावले यांनी प्रवेश कर्त्यांना सांगितले.

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, उप तालुकाप्रमुख सतीश शिंदे, अनिल दळवी, या भागातील आणि तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.



