पैलवानांचं आंदोलन तूर्तास स्थगित, 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु, अनुराग ठाकूर यांचं आश्वासन
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
आंदोलक पैलवानांसोबत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची चर्चा झाली. तब्बल सात तासांच्या चर्चेनंतर अनुराग ठाकूर यांना कुस्तीपटूंना अश्वासन दिलेय. 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु असे अश्वासन अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना दिले. त्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतलाय. अनुराग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीला कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक उपस्थित होते. कुस्तीपटूंनी या बैठकीत 5 मागण्या केल्या. यामध्ये बृजभूषण सिंह यांना अटकेच्या मागणीवर जोर दिला.
पैलवानांसोबत सकारात्मक चर्चा झाली. 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु असे अनुराग ठाकूर यांनी आश्वासनल दिले. त्यानंतर पैलवानांचं आंदोलन तूर्तास स्थगित झालेय. बजरिंग पुनिया यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सांगितलेय. तसेच बृजभूषण सिंग यांच्याविरोधात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा विचार करु, असंही साक्षीने स्पष्ट केलं.



