तालुका
रोहिदास तरुण विकास मंडळ महाड यांनी महाड नगर परिषद शाळा क्र. 5 येथील 10 मुले घेतली दत्तक
मंडळातील सभासदांनी देखिल वैयक्तिक प्रत्येकी १/२ असे १० विद्यार्थी घेतले दत्तक

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : 18 जुन रोजी रोहिदास तरुण विकास मंडळ महाड यांनी मंडळाच्या वर्ष ५० व्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या सुरवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज महाड नगर परिषद शाळा क्र.५ येथील १० मुले दत्तक घेतली.
रवींद्र कानू महाडिक, सुधिर परशुराम महाडिक, अनिल रामचंद्र खिलारे, सुरेश(बाळा) दौलत महाडिक, शेखर पांडुरंग महाडिक, सचिन विजय चांदोरकर, नितिन विजय चांदोरकर आणि स्वप्निल सुरेश कांबळे यावेळी या मंडळातील सभासदांनी देखिल वैयक्तिक प्रत्येकी १/२ असे १० विद्यार्थी दत्तक घेतले.
असे एकूण २० मुले दत्तक घेऊन मंडळाच्या वर्ष ५० व्या सुवर्ण महोत्सव वर्षाची सुरवात केली.



