तालुका

आदिती नाईक यांच्या प्रयत्नाने होणार चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम

बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग

चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याची झालेली दुर्दशा व त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन रायगडचे उमलते युवा नेतृत्व आदिती नाईक यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने व कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ दळवी व जिल्हा परिषद सदस्या सौ. मानसीताई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आता  चेंढरेकरांना मिळणार व्यवस्थित रस्ता.

या कामाचा शुभारंभ संपन्न झाला. या कामाच्या पहिल्या टप्यात रॉयल मोटार ते चेंढरे ग्रामपंचायत येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार आहे.

या शुभारंभ प्रसंगी आमदार महेंद्रशेठ दळवी, जिल्हा परिषद सदस्या मानसीताई दळवी, पंचायत समिती सदस्या जुईली दळवी, शंकरगुरव, आदिती नाईक, मिलिंद नाईक तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!