महाड तालुका महिला आघाडी शिवसेना आयोजित मंगलागौर स्पर्धेला उदंड प्रतिसाद
आमदारकीच्या विजयी चौकारात महिलांचा मोठा वाटा असणार, शिवसेना महिला आघाडी महिलांच्या कलेला वाव देण्याचे काम करेल - आमदार भरतशेठ गोगावले

सतिश मेहता – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक नाट्यगृहामध्ये 29 ऑगस्ट रोजी मंगलागौर स्पर्धेचे आयोजन महाड तालुक्यामधील शिवसेनेच्या महिला आघाडी यांनी केले होतो.
हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला, या कार्यक्रमाला महिला वर्ग यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
महाड शहरी व ग्रामिण भागातील महिलांमध्ये दडलेल्या कलेला वाव देण्यासाठी शिवसेना महिला आघाडीने मंगलागौर स्पर्धा, होममिनीस्टर, जागर स्त्री शक्तीचा असे कार्यक्रम आयोजित करून एक व्यासपीठ दिले आहे.

दहीहंडी सारख्या स्पर्धेत महिला गोविंदा पथकांनी सहभागी होत आपण कुठेही कमी नाही हे सिद्ध केले असून शिवसेना महिला आघाडी शहरी व ग्रामिण भागातील महिलांच्या कलेला वाव देण्याचे काम करेल असे अभिवचन महाड तालुका महिला आघाडी शिवसेनेच्या वतीने महाड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील नाट्यगृहात आयोजित केलेल्या भव्य मंगलागौर स्पर्धे प्रसंगी बोलताना दिले.
यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी बोलताना महाड विधानसभा मतदार संघातून आपण तीन वेळा विजयी होण्यात महिला भगिनींचा मोठा वाटा असून आमदारकीचा चौकार लगावण्यासाठी मोठा भार शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उचलला आहे असे सांगितले, मतदार संघातील जनतेला आनंद मिळावा आणि त्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन शिवसेनेच्या वतीने वेळोवेळी केले जाते असे सांगितले.
महाड मधील भव्य दहीहंडी स्पर्धा हा त्यातील एक उपक्रम होता, या दहीहंडी उत्सवाला ९७ पथकांनी हजेरी लावली होती. माणगांव येथील पथकाने ८ थरांची सलामी लावून ग्रामिण भागातील गोविंदा पथकेही कमी नाहीत हे सिद्ध केले आहे. याच बरोबर महिला पथकांनीही सहभागी होत आपले कसब दाखवून दिले. महाराष्ट्र शासन महिला, ज्येष्ठ नागरिक, वृद्धांसाठी विविध योजना राबवत असल्याची माहिती देत आमदारकीचा चौकार मारण्यासाठी माता भगिनींनी आशिर्वाद द्यावेत असे आवाहन उपस्थित महिलांना केले.
याप्रसंगी दहीहंडीच्या तिसऱ्या थरावर चढणाऱ्या ६७ वर्षीय कांचन चव्हाण यांचा रोख बक्षिस देऊन आमदार गोगावले यांनी गौरव केला. या स्पर्धे दरम्यान गोगावले कुटुंबियांनी फुगडी घालत स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. ग्रामिण भागातील महिलांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेकरीता २६ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे परिक्षक म्हणून सोनिया रुपवते व मुकेश रुपवते यांनी काम पाहिले तर सुत्र संचलन सारीका राजगुरू यांनी केले.
यावेळी माजी राजिप सदस्या सुषमा गोगावले, महिला आघाडी प्रमुख निलीमा घोसाळकर, माजी सभापती सपना मालुसरे, कोमल मोरे, साधना गोगावले, शितल कदम आदी पदाधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



