तालुका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुका कार्याध्यक्ष पदी रामभाऊ कांबळे यांची निवड

 

अनिल अवताडे – तालुका प्रतिनिधी माढा         

माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुका कार्याध्यक्ष पदी बेंबळे येथील रामभाऊ अनंता कांबळे यांची निवड करण्यात आली. विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मा. विष्णूपंतदादा हुंबे यांचे समर्थक आणि निकटवर्तीय असलेले रामभाऊ कांबळे यांना तालुकाध्यक्ष धनंयज साठे यांच्या सहीचे पत्र जिल्हा परीषद सदस्य रणजीतभैय्या शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी जिल्हापरीषद सदस्य रणजीतभैय्या शिंदे, संचालक विष्णूपंतदादा हुंबे, मार्केट कमिटीचे संचालक दिलीपराव भोसले यांच्यासह बेंबळे आणि परिसरातील रामभाऊ प्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक विष्णूपंतदादा हुंबे यांनी रामभाऊंचे अभिनंदन करुन पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!