तालुका
सावित्री नदीमधला गाळ उपसण्याचे कामाला वेग मिळावा यासाठी नवीन तंत्रज्ञान असलेल्या मशिनरीचा वापर
राकेश देशमुख – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड येथील सावित्री नदीला आलेल्या पूरामुळे मोठे नुकसान झाले होते. या नदीमधला गाळ उपसण्याचे काम शासना मार्फत सुरू आहे, या कामाची राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनीकामाची पाहणी केली.
नदीतील गाळ उपसण्याचे काम नवीन तंत्रज्ञान असलेल्या मशिनरीजचा वापर करून गतीमान पध्दतीने करण्यात येत असून लवकरच ही प्रक्रीया पुर्ण होणार आहे. यामुळे महाडकरांना आश्वासित केल्याप्रमाणे अभिप्रेत असलेले काम त्यांना मिळणार आहे.



