ब्रेकिंग

ट्रक – टँकर चालकांचा संप: अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचा तुटवडा

एस. टी वाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राज्यातील मालवाहतूक करणाऱ्या ट्रक – टँकर चालकांनी संप पुकारला आहे. 3 जानेवारी पर्यंत हा संप सुरू राहणार आहे. मात्र, त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. टँकर चालकही या संपात सहभागी असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर टाकी फूल्ल करण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर, दुसरीकडे हा संप लांबल्यास एसटी महामंडळाच्या वाहतुकीवरही इंधन अभावी परिणाम होण्याची भीती आहे.

मालवाहतूकदारांच्या संपात पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी सहभाग घेतला आहे. पेट्रोल डिझेल तुटवडा पडू शकतो म्हणून पेट्रोल पंपावर लांबच रांगा पाहायला मिळत आहे.

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. भारतात 28 लाखांहून अधिक ट्रक चालक 100 अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात. या ट्रकवर 50 लाखांहून अधिक लोकं काम करतात. अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातही सर्रास घडत आहेत. त्यामुळेच सरकारने नवीन कायदा आणला असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!