आरोग्य व शिक्षण
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे शस्त्रक्रिया शिबीर आयोजित

मितेश महाले – सहसंपादक महाराष्ट्र राज्य
नशिक: राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत दिनांक 13 सप्टेंबर रोजी डॉ. अशोक थोरात व डॉ. प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये डॉ. बाबुलाल अग्रवाल, डॉ. तुषार खैरे, डॉ. सुमित बर्वे यांच्या मार्फत या शिबिरात नऊ बालकांच्या circumcision, orchidopexy, gangilon, piles, Hernia च्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या मध्ये डॉ. संजय चौधरी यांचे विशेष सहकार्य झाले. तसेच आरबीएसके पथके ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांनीही परिश्रम घेतले, त्याबद्दल डॉ. अशोक थोरात, डॉ. प्रशांत खैरे, डॉ. अग्रवाल, डॉ. तुषार खैरे, डॉ. सुमित बर्वे, डॉ. चौधरी व आरबीएसके पथके, ग्रामीण रुग्णालय पथके व ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.




