तालुका

न्यूझीलंड येथील आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ पावर लिफ्टिंग स्पर्धेत प्रतीक्षा गायकवाड/शिगवण 525 किलो वजन उचलून विजयी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते सत्कार

 

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

रायगड : २०२२ सीनियर नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये ५६५ किलो वजन उचलून तृतीय क्रमांक प्राप्त केला असून तसेच २०२२ ऑल इंडिया पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप ५२० किलो वजन उचलून द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून प्रतीक्षा हीने सदर स्पर्धेत विजय प्राप्त करत, महाराष्ट्राची आणि खास करून रायगड जिल्हा महाडची मान बाहेर देशात जाऊन उंचावण्यत यश प्राप्त केले, असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रतीक्षा गायकवाड यांचा वर्षा या निवासस्थानी सन्मान केला, तसेच दोन लाख रुपयांचे रोख आर्थिक सहाय्य देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित दिले, त्यावेळी सोबत प्रतीक्षा चे आई वडील बहीण इत्यादी उपस्थित होते.

प्रतीक्षा यांची मुलाखत माननीय मुख्यमंत्री महोदयांसमवेत आमदार भरतशेठ गोगावले यांनी घडवून आणली, कारण प्रतीक्षा ही महाड विधानसभा मतदारसंघातील आसनपोई या गावची रहिवासी असल्याने महाड विधानसभा मतदारसंघाचे नाव तेवढेच उंचावर नेण्यास प्रतीक्षा गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!