मुंबई गोवा महामार्गावर विदेशी मद्याचा साठा कारसह जप्त
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क महाड विभाग कार्यालयाची उल्लेखनीय कामगीरी
विनोद कासारे – शहर प्रतिनिधी महाड
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क महाड यांना खात्रीशीर खबर प्राप्त झाली होती की, मुंबई गोवा महामार्गावर पोलादपुर हद्दीमध्ये गोवा राज्य निर्मित अवैध विदेशी मद्याची विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक केली जाणार आहे, या अनुषंगाने १५ जानेवारी २०२२ रोजी रात्री ०१.३० वाजता पोलादपुर येथे वाहनावर पाळत ठेवली असता एक मारूती ओमनी कार चिपळूण दिशेने येताना दिसली, सदर वाहनास थांबण्यास इशारा केला असता सदर कार न थांबता महाड दिशेने सुसाट निघाली, वाहनाचा पाठलाग करुन मौजे लोहारमाळ येथे तुर्भे गावात जाणाऱ्या पुलाशेजारी मुद्देमाल उतरवित असताना रंगेहाथ पकडण्यात आला, सदर वेळी केलेल्या कारवाईमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गोवा विदेशी मद्याचे ४५ बाक्स जप्त करून ०२ आरोपीना अटक करून त्यांच्या ताब्यातून ३,८५,००० इतक्या किंमतीचा मुद्देमाल सह मारुती ओमनी का रसह जप्त करण्यात आली.
आरोपीची नावे व्यकटेश मधुकर महाडीक वय ३९ वर्षे, रा रेवतळे चिपळूण, रमेश अनंत गायकवाड वय ४८ वर्षे रा कुंभारआळी महाड व मारूती ओमनी कार एमएच ०८ सी ०२३० आणि मुद्देमालासहित ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई कांतिलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशानुसार सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त, कोकण विभाग, ठाणे व श्रीमती उषा वर्मा, संचालक ( अ.व द ) राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग व विश्वजीत देशमुख, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये निरीक्षक प्रविण सोनवणे, दुय्यम निरीक्षक शंकर जाधव, जवान सर्वश्री सुरेंद्र महाले, चेतन भोई यांनी सदर कारवाईमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला. सदर गुन्हयाची फिर्याद सुरेंद्र महाले जवान यांनी दिली असून पुढील तपास शंकर जाधव दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क महाड पोलादपुर विभाग हे करीत आहेत.
प्रविण सोनवणे निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क महाड विभाग यांनी जनतेस आवाहन करण्यात केले की, अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ व व्हॉटस अॅप क्र ८४२२००१ ९ ३३वर संपर्क साधावा.



