तालुका

पाली नगरपंचायती मधील सदस्य पदांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

राजू शेख – तालुका प्रतिनिधी पाली

विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात दि.24 नोव्हेंबर 2021 पासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

त्यानुसार रायगड जिल्ह्यातील पाली नगरपंचायतीमधील 1 ते 17  येथील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अधिकाऱ्यांच्या नेमणूका व तारखा निश्चित केल्या असून त्या पुढीलप्रमाणे :

पाली नगरपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रोहा श्री. डॉ. यशवंत माने तर सहाय्यक निवडणूकनिर्णय अधिकारी म्हणून पाली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती अंगाई साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी– दि.1 डिसेंबर 2021 (बुधवार) सकाळी 11.00 ते दि.07 डिसेंबर 2021 (मंगळवार) दुपारी 2.00 पर्यंत.

नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी– बुधवार, दि.1 डिसेंबर 2021 ते मंगळवार, दि.07 डिसेंबर 2021 (दुपारी सकाळी 11.00 तेदुपारी 2.00 पर्यंत.), दि.4 डिसेंबर 2021 (शनिवार)  व दि.05 डिसेंबर 2021 (रविवार) सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यातयेणार नाही.

नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचे ठिकाण– तहसिल कार्यालय, सुधागड, ता.सुधागड, जि.रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननीची तारीख ववेळ– दि.08 डिसेंबर 2021 (बुधवार,सकाळी 11.00 वाजल्यापासून), नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व मागे घेण्याची जागा– तहसिल कार्यालय, सुधागड, ता.सुधागड, जि.रायगड, वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक– दि.8 डिसेंबर 2021  (बुधवार) छाननी संपल्यानंतर, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक (अपील नसेल तेथे)-दिनांक 13 डिसेंबर 2021 (सोमवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत,

अपील असल्यास–वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशाकडे अपिल करता येईल, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठीप्रयत्न करावेत– अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक 16 डिसेंबर2021 (गुरुवार) पर्यंत.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमदेवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक– अपिल नसेलतेथे दिनांक 14 डिसेंबर 2021 तर अपिल असल्यास दिनांक 17 डिसेंबर 2021.

आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक– दिनांक 21 डिसेंबर 2021 (मंगळवार) सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत.

मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक– दिनांक 22 डिसेंबर 2021 (बुधवार) सकाळी 10.00 वाजल्यापासून, मतमोजणीचेठिकाण– हिरकणी कक्ष, तहसिल कार्यालय, सुधागड, ता.सुधागड, जि.रायगड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!