हरकोल मोहल्यातील महिलांसह मुस्लिम बांधवांनी केला शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड विधानसभा मतदारसंघ माणगाव तालुका मांजरावने विभागातील हारकोल मोहल्ला मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना करत असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवत माणगाव येथील एका छोट्या कार्यक्रमात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी आशिब आमटे, शुयेब हनीप पाल, नजीर मोमीन, इब्राहिम मोमीन, नदीम पाल, वसीम पाल, महंमद पाल, अरबाज पाल, अरबाज ओमर, शौकत उमर, अजगर ओमर, दिलावर ओमर, अजगर पाल, मोहम्मद उमर, शाहीना पाल, सितारा पाल, मधीया पाल, सलवा पाल, मिनाज ओमर, रमीज पाल, नाहिला ओमर, सलमा पाल, सिमरन पठाण, सलाम उमर, मुक्तार उमर, नवाज उमर, भैरवजा ओमर, हिदायत ओमर, आदिल ओमर मंसूत ओमर, मुनाफ ओमर, सतार ओमर, गफार ओमर, शाबीर ओमर, हसण पाल, राहील पाल, मोहम्मद पाल, मुशरप पाल, यासीन जामदार, शौकत पाल, हवाद मोमीन, फैसल मोमीन, शाहीन ओमर, दिलशाद ओमर इत्यादी मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी संपर्कप्रमुख अरुण चाळके, चंद्रकांत कळंबे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, राजा केणी, महिला संघटिका नीलिमा घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय सावंत, माणगाव तालुका संपर्कप्रमुख जोरकर, माणगाव तालुकाप्रमुख महेंद्र मानकर, मांजरवणे विभागप्रमुख शरीफ हारगे, तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महिला संघटिका उपस्थित होते.
प्रवेश कर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते भगव्या पताका घालून पक्षात स्वागत केले. आपली जी काही उर्वरित विकास कामे असतील ती आम्ही लवकरच पूर्ण करू असा आत्मविश्वास प्रवेश कर्त्या महिला भगिनींना आणि ग्रामस्थ यांना आमदार भरतशेठ गोगावले दिला. यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि या भागात संपर्क राखण्यासाठी महिलांना संघटनेकडून जबाबदारी देण्यात आली त्याचे नियुक्तीपत्र देखील दिले.



