ब्रेकिंग
मुंबईच्या खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्याकडून विनयभंग, परिसरात संतापाची लाट

भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा
खारघर : बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईच्या खार दांडा परिसरात देखील अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे. यात दोन सख्या अल्पवयीन मुलींचां विनयभंग झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुलींच्या आई वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तर याप्रकरणी खार पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमन सिंग असून तो फिर्यादी यांच्या शेजारी राहणारा असल्याची माहिती पुढे आली आहे.सध्या खार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून परिसरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.



