डोंबवली मध्ये Omicron Variant ची लागण, पहिला रुग्ण आढळला
महाराष्ट्रात Omicron Variant ची पहिली केस
नागरिकांनी घाबरून जाऊ नये व दोन्ही डोस घेण्याचे केले आवाहन – मंत्री राजेश टोपे
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
डोंबिवली मधील एका 23 वर्षाच्या तरुणाला कोविड 19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची बाधा. केपटाऊन–दुबई ते नवी दिल्ली ते मुंबई असा प्रवास करत हा तरुण आला होता.
सौम्य ताप आणि खोकला अशी लक्षणं दिसल्यावर त्याची कोविड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. जनुकीय तपासणी केली असता त्यांस ओमायक्रॉन व्हेरियंटची बाधा झाली असल्याचे स्पष्ट.त्यांच्या हाय रिस्क कॉंटैक्टमधील बारा तर लो रिस्ककॉंटैक्टमधील २३ लोकांचे स्वैब चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.
राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 डिसेंबर पासून ३८३७ नागरिकांचे स्वैब घेतले आहेत. त्यापैकी सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे अहवाल जनुकीय तपासणी साठी देण्यात आले आहेत. मागील महिन्यातही अठ्ठावीस आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेअहवाल जनुकीय चाचणीसाठी देण्यात आले आहेत.
ओमायक्रॉन बाबत दक्षिण आफ्रिकेतून माहिती घेतली जात आहे. रुग्णांवर किती परिणाम होतो, उपचार आणि इतर बाबींची माहिती घेतली जात आहे. पूर्ण माहिती मिळाल्यावर आयसीएमआर त्याबाबत प्रोटोकॉल निश्चित करेल. त्यानंतरच त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मंत्री राजेश टोपे यांनी सर्व नागरिकांना दोन्ही डोस घेण्याचे केले आवाहन, ज्यांनी कोविड लस घेतली नाही, त्यांनी पहिली लस घ्यावी. पहिली घेतली असेल तर दुसरी मात्रा घ्यावी. परदेशातून आलेल्या नागरिकांनी चाचणी करून घ्यावी. लक्षणे आढळल्यास तत्काळ संबंधित शासकीय दवाखान्यात संपर्क साधावा.



