तालुका

म्हासळा तालुक्यातील संदेरी येथे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

 

अनिकेत मोहित / श्रीवर्धन शहर 

म्हसळा: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर म्हसळा तालुक्यातील संदेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. १६ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात संदेरीकरांच्या वतीने पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विकासकार्यावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी हा प्रवेश केला. यामध्ये प्रमुख पक्षप्रवेशकर्ता: दिलीप महादेव नागती, सखाराम नागती, बाळूदास पाष्टे, राजाराम गोरीवले, विजय गणपत पाष्टे आणि संदेरी गावातील प्रमुख नागरिकांसह आदिवासी वाडी आणि बोधेवाडी येथील महिला, युवक व ज्येष्ठांचा मोठा सहभाग होता.

या कार्यक्रमास रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, लोकसभा प्रमुख अनिल नवगणे, जितेंद्र सावंत, ज्ञानदेव पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संदेरी परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संदेरीसारख्या गावातून सर्व समाजघटकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे म्हसळा तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाली आहे. जनतेचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अहोरात्र काम करू, असा शब्द याप्रसंगी पालकमंत्र्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!