तालुका

शेनवली हद्दीत विजेची तार पडून एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यु

सूरज पुरारकर – तालुका प्रतिनिधी तळा

शेणवली हद्दीतील तटकरे यांच्या शेतात आलेल्या वादळी पावसात वीजेची तार खाली पडली आसता त्या तारेतून वीज प्रवाह चालु होते, ट्रान्सफर्मार ला कोणत्याही प्रकारचे फियुज ट्रिपर नसल्याने विजेचा प्रवाह चालुच होते. मयत ऋतिक यशवंत हीलम वय वर्षे ९ रा. खांबवली, आदिवासी वाडी, ता. तळा दी. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.१५ वाजता चे दरम्यान शेतातून जात असताना शेणवली गावचे हद्दीतील तटकरे यांच्या शेतातील विजेच्या पोलवरून पडलेल्या तारेचा शॉक लागून ऋतिक हीलम याचे दुर्दैवी मृत्यु झाले.  सदर मृत्युचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने फाटक हे करीत आहेत. मयत ऋतीक हीलम यांच्या कुटुंबियांना महावितरण कंपनी कडून मदतमंजूर करण्यात आली आहे, तात्काळ मदत म्हणुन मदत देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!