तालुका

हर हर महादेव : संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेला महाड मनसेचे थेट आव्हान – या वाट बघतोय

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

महाड दि. 10 छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखविल्याचा आक्षेप घेत, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र या संघटनेने हर हर महादेव या चित्रपटाला विरोध केला आहे. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखविण्यात येवू नये, अशी निवेदने चित्रपटगृह मालकांना देण्यात आली आहेत. महाडमध्येही संभाजी ब्रिगेडने ही भूमिका घेत, चित्रपटाचा खेळ बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र, या चित्रपटाला पाठिंबा दर्शवित, संभाजी ब्रिगेडला, खेळ बंद पाडून दाखवाच असे आव्हान दिले आहे.

महाड येथील के. सेरा (पी.जी. सीटी) मिनी प्लेक्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांनी एक चित्रफित प्रकाशित करीत, तुम्ही या, आम्ही वाट पाहतोय असे थेट आव्हानच संभाजी ब्रिगेडला दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!