ब्रेकिंग

दासगाव जेट्टी – गोठे दरम्यान सावित्री नदीवरील नवीन पूलास ११२ कोटी ५० लक्ष रुपयांची मंजुरी

शासन दरबारी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यांना यश आमदार भरतशेठ गोगावले यांनी मानले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शासनाचे आभार

मंडणगड, दापोली, खेड, करंजाडी विन्हेरे आणि खाडीपट्ट्यातील प्रवाशांचा मार्ग होणार सुखकर

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातील ६० गावे जोडली जातील, मंडणगड, दापोली कडे जाणारा नवीन नजिकचा मार्ग तयार होईल तसेच करंजाडी – विन्हेरे – फाळकेवाडी – तुळशी मार्गे मुंबई गोवा मार्गावर नातूनगर आणि खवटी यांचेमधे असणारे तुळशी रोड जंक्शनवर जोडला जाणारा हा मार्ग होऊ शकतो ही मुळात कोंकण विकास समितीची अडीच वर्षापूर्वीची संकल्पनाच खूप काही सांगून जाते.

महाड खाडीपट्ट्याचे ६० गावांना आता २२ किलोमीटरचा मुंबई कडे महाडमार्गे जाणेचा वळसा कमी होणार आणि दापोली, खेड, मंडणगड कडे जाणेकरिता वीर – दासगाव जेट्टी – गोठे – करंजाडी हा नवीन रस्ता आणि सावित्री नदीवरचा पुल नक्कीच दुवा ठरणारा मार्ग होणार आहे.

या यशात सहभाग घेणारे – योगदान देणारे सर्व आदरणीय सदस्य – सहकारी, हितचिंतक तसेच पत्रकार यांचे ही मानले आभार.

मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात बजेट मध्ये ११२ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर झालेल्या या रकमेतून दासगाव-गोठे या ठिकाणी पूल आणि रावढळ – सापे – वामने या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

कोकणात आणि महाड तालुक्यात जाणाऱ्या प्रवाशाची एवढि मोठी समस्या दूर केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे महाड विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार भरतशेठ गोगावले यांनी जाहीर आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!