साई प्रतिक्षा गृप आयोजित बॅाक्स प्रिमियर लिगमध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स अंतिम विजेता
सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड
महाड: दि. 5 महाडमध्ये साई प्रतिक्षा गृप सरेकर आळी आयोजित माजी नगराध्यक्ष संदीप जाधव पुरस्कृत विद्युत झोतातील बॅाक्स प्रिमियर लिगमध्ये चॅंपियन स्पोर्ट्सने अटीतटीच्या सामन्यात अंतीम विजेते पटकावले तर आद्विक इलेव्हन संघाने उपविजेतेपद मिळवले. तृतीय क्रमांक चेतन उतेकर मित्रमंडळ तर चतुर्थ क्रमांक अन्वी स्पोर्ट्स संघाने मिळवला.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहन गोलांबडे (अन्वी स्पोर्ट्स), सर्वोत्कृष्ट खेळाडू शकील खान (चेतन उतेकर मित्र मंडळ), सर्वोत्कृष्ट गोलंदाज शहजाद खान (चॅंपीयन स्पोर्ट्स) सर्वोत्कृष्ट फलंदाज अरबाज कारविनकर ( चॅंपीयन स्पोर्ट्स) आणि मालीकाविर चा बहुमान अन्वी आद्विक इलेव्हनच्या सुरज सावंत याला देण्यात आला.
तीन दिवस सुरु असलेल्या या सामन्यांतील सर्वच लढती अत्यंत प्रेक्षणिय झाल्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संदीप जाधव यांच्या हस्ते संपन्न होता. यावेळी बापू यादव, आनंद साळुंके, अनिकेत कदम, परमानंद जाधव, रूपेश पवार, विनय कलमकर, निलेश यादव, भुषण सावंत, सनी हाटे, आमरिष मोहिते, राजू जाधव आदी उपस्थित होते. सामन्यांचे समालोचन हरिष दिघीकर आणि संदीप गायकवाड यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ऋषीकेश यादव, साहील धाडवे, मयुरेश खांडेकर, साहिल दुधगावकर, दिलीप ठाकूर, विजय साळुंखे, प्रफुल उमासरे ,ओंकार धारिया, सिद्धेश पांडे, बाळू भुवड आदी साई प्रतिक्षा गृपच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी मुंबई विद्यापिठाच्या हेप्टेत्लॅान स्पर्धेत रौप्य पदक मिळवलेल्या डॅा. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या स्वरूपा बिपीन लाखन व जिल्हास्तरीय रिले स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणा-या धैर्य पंकज जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या स्पर्धेला क्रिकेट रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.



