विहिरीच्या संरक्षक कठड्याचे उदघाटन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते
सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड
महाड : धारिया कॉर्नर प्रभात कॉलनी महाड येथील विहिरीच्या संरक्षक कठड्याचे उदघाटन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पक्षप्रतोद तथा उपनेते आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते पार पडले.
सदर विहिरीला सरंक्षक कठडा नसल्यामुळे पुराचे पाणी जाऊन पाणी दूषित होत असे याबाबत अमित शेट्टी, उपशहर प्रमुख, महाड शहर यांच्या मार्फत धारिया कॉर्नर मधील राजेश भोनकर, चव्हाण, रेवाळे, सुर्वे, अध्यक्ष दिलीप साळवी, जाधव सर, फुलमाळी, जयेश पाटील, साळुंके, दिपक पवार व सर्व सभासदांनी आमदार भरतशेठ गोगावले यांना सरंक्षक कठडा बांधुन मिळण्या बाबत निवेदन दिले.
आमदार भरतशेठ गोगावले तात्काळ रोख रक्कम देऊन मदत केली, आज सदर विहिरीच्या संरक्षक कठड्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाला शहर प्रमुख नितीन पावले , संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर, संघटक निखील शिंदे, बंधु तरडे, नितीन आर्ते, सिद्धेश मोरे, नगरसेवक सुनील अगरवाल, शुभांगी शेडगे, सायली मेहता, डॉ चेतन सुर्वे, महिला संघटक विद्याताई देसाई, उद्योजक पप्पू शेठ माळी, उपशहरप्रमुख श्रीकृष्ण बाळ, सुयोग पाटील, योगेश नातेकर, दादू जाधव , विभाग प्रमुख अतुल मोरे, विजय मेहता, भरतशेठ गोगावले मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू पावले, निलेश तलाठी, सागर घोलप, प्रतिक पलंगे, गुड्डु माळी, तुषार महाडिक, बंधु मोरे, तेजस भागवत, सुबोध गांगण, भाई महाडीक, प्रसाद नगरकर, विजय मोरे, जेष्ठ शिवसैनिक, वसंत भाई तलाठी , नाना माळी , अशोक शेठ , संतोष शेठ , संतोष सावंत, कांबळेकर सर, सिद्धी मोरे, ज्योती निकम, श्रीमती पुजा जाधव, कु.लाजरी मराठे व प्रभात कॉलनी मधील जेष्ठ शिवसैनिक , शहरातील सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधु आणि धारिया कॉर्नर सर्व सभासद, महिला आणि युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्या करिता धारिया कॉर्नर मधील सर्व सभासदांनी मेहनत घेतली.



