श्री. गणेश उत्सव मंडळ व शारदा उत्सव समिती गावदेवी मुंबई यांनी पनवेल व तळा तालुक्यातील शाळांना केली मदत
सुरज पुरारकार – तालुका प्रतिनिधी तळा
नुकतेच आपण सर्वजन कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडत आहोत. शाळा हळूहळू सुरू होत आहेत, कोरोना काळात सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थीती बिकट झाली, याचा परिणाम आदिवासी समाजावरही मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचे आपण पहिलेच, म्हणूनच शिक्षण व शाळेची गोडी लावण्यासाठी गोरगरीब व अनाथ मुलांसाठी आज दि. २५ / २६ फेब्रुवारी २०२२ रोजी श्रीगणेशोत्सव मंडळ व शारदोत्सव समिती गावदेवी मुंबई नं ०७ यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील जि.प. शाळा भेरले, जि. प. शाळा पोयंजेवाडी, जि.प. शाळा खानावळे वाडी, जि.प. शाळा बारवई वाडी, जि.प.शाळा पाली वाडी, आणि तळा तालुक्यातील तळेगाव केंद्र, पिटसई केंद्र, तळा केंद्र, मजगाव केंद्र, टोकार्ड केंद्र महागाव केंद्र, बोरघर केंद्र या ठिकाणी प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी लागणारे शालेय उपयोगी साहित्य जसे दप्तर, पाणी बॉटल, वह्या यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनुषजी गावंड, उपाध्यक्ष संजय बागकर, चंद्रशेखर मंचेकर, खजिनदार पांडूरंग बागकर आणि संदेश वाजे उपस्थित होते.
तळा तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन, समिती, सर्व शिक्षक वर्ग यांनी मंडळाचे खूप आभार मानले.



