कंपनीमध्ये वायू गळतीमुळे एका कामगाराचा मृत्यू तर चार जखमी या प्रकरणी विकासशेठ गोगावले यांनी दिली भेट
प्रसोल केमिकल कंपनी कोणत्याही परसस्थितीत सुरु होऊ देणार नाही / ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ कंपनीने थांबवावा
ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून कंपनीने व प्रशासनाने निर्णय घ्यावा – युवा सेना कोर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले
समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर
महाड : महाड एमआयडीसी मधील प्रसोल केमिकल या कंपनीमध्ये चार दिवसापूर्वी वायू गळती झाल्यामुळे या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला आपला जीव गमवावा लागला आणि इतर चार कामगार जखमी झाले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक पुन्हा एकदा आक्रमक झाले असल्याचे आपल्याला पहायला मिळते.
यापूर्वी देखील याच कंपनीमध्ये वर्षभरात एकूण दोन अपघात घडून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता, या कंपनीमध्ये वारंवार होतअसलेल्या वायू गलती मुले येथील स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत.
ग्रामस्थांनी यापूर्वी देखील वारंवार या कंपनीला भेट देऊन कंपनी कायमस्वरूपी बंद करा अशी मागणी केली होती, मात्र प्रशासनामार्फत तात्पुरत्या कालावधीसाठी ही कंपनी बंद ठेवून पुन्हा एकदा कंपनी सुरु करण्यात आली, आणि आता या अपघाताचे सत्र सुरूच राहते की काय या त्यामुळे भीतीमुळे कंपनीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष वाढला असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रसोल कंपनी कायमस्वरूपी बंद करा अशी मागणी केली आहे, त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामस्थ यांनी देखील ही कंपनी कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी केली आहे, याच पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांनी प्रसोल कंपनीला भेट देत कंपनी प्रशासनाला धारेवर धरले.
प्रसोल कंपनी ही स्थानिकांच्या जीवाशी खेळत असून सदर कंपनी ही कायमस्वरूपी बंद करा, ग्रामस्थ यांच्या मागणीची दखल घेत लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहणार, जोपर्यंत कंपनी प्रशासन ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत हा कंपनी सुरू होऊ देणार नाही असा ठाम पवित्रा घेतला असून स्थानिक ग्रामस्थ आणि कंपनी प्रशासन यांनी या गोष्टीमध्ये तोडगा लवकरच काढून कारखाना सुरू केल्यास आमची कोणतीही हरकत राहणार नाही परंतु स्थानिकांचा विरोध ठाम असल्यास आम्ही स्थानिक ग्रामस्थ यांच्या बरोबरच राहणार असल्याचे शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांनी सांगितले.



