ग्रामपंचायत बिरवाडी हद्दीमध्ये शिवसेनेकडून विकास कामांची वचनपूर्ती
कामांचा दर्जा चांगल्या प्रतीचा ठेवा संबंधित ठेकेदार, सरपंच आणि लोकप्रतिनिधींना आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिल्या सूचना
स्वप्नील ढवण – उपसंपादक
महाड तालुक्यातील महत्वाची म्हणून नावाजलेल्या बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये रायगड जिल्हा युवा अधिकारी विकासशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आणि सरपंच अँड. मनोज पवार यांच्या पाठपुराव्याने सुमारे ६५ लक्ष रुपयांच्या रस्ते, गटार लाईन तसेच विविधविकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
यावेळी रायगड जिल्हा युवा अधिकारी विकासशेठ गोगावले, लक्ष्मी ऑर्गानिक इंडस्ट्रीज लिमिटेडचे या कंपनीचे प्रमोद सानप, ज्येष्ठनागरिक अध्यक्ष संघ बिरवाडी विजय घोसाळकर, महाड विधानसभा संपर्क प्रमुख विजय सावंत, पंचायत समिती सभापती महाड सिद्धी खांबे, जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, बिरवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मनोज पवार, उपसरपंच संदीप कुंभार, विभाग प्रमुख दिलीप शिंदे, युवा सेना जिल्हा समन्वयक अधिकारी इम्रान पठाण, महिला विभाग प्रमुख बिरवाडी कुंदाताई पवार, ज्योती गुरव, बिरवाडी शहर प्रमुख संतोष कदम, उपशहर प्रमुख संदीप मामा कदम, विजय साळवी, महेश देशपांडे, बिरवाडी महिला शहर प्रमुख मानसी पवार, बिरवाडी युवासेना विभाग अधिकारी अशिष म्हस्के, रहीम सावरटकर, बिरवाडी ग्रामपंचायत मधील शिवसेना युवा सेनेचे आजी–माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, बिरवाडी ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी बिरवाडी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी युवा नेते विकास गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की जनतेने आपल्याला बहुमताने सत्ता हाती दिली आहे, त्यासत्तेचा जनतेची विकास कामे करून, जनतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी बैठक हॉल ची व्यवस्था पण केली आहे, अशीच वयोवृद्ध ज्येष्ठांची सेवा करत राहणार, बिरवाडी शहरासाठी आपण दिलेला शब्द नक्कीच पूर्ण करणारव सर्व विकास कामे पण करणार आहोत असे सांगितले.
आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात लक्ष्मी ऑर्गानिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने सी. एस. आर. होंडा मधून एकट्रॅक्टर ट्रॉली सहित कचरा उचलण्यासाठी दिला आहे, त्यांचे देखील विशेष आभार मानले, बिरवाडी शहराच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्या संदर्भात आपले आणखी आम्हाला सहकार्य लागणार आहे असे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे सानप साहेब यांना सूचना दिलीत सेच विकास कामे करण्यासंदर्भात आमदार गोगावले साहेबांनी सूचनावजा इशारा देत सांगितले की संबंधित ठेकेदारांनी कामाचा दर्जा व्यवस्थित ठेवावा, थातूर मातूर कामे करून जनतेची दिशाभूल करू नये, त्यासाठी सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी स्वतः उभे राहून लक्ष द्यावा अशा सूचना दिल्या, एवढीच विकास कामे करून थांबणार नसून भविष्यात बिरवाडी शहराचा आपण नक्कीच कायापालट करणार आहोत असे सांगितले.



