ब्रेकिंग

महाड नगरपालिकेकडून मोरीमध्ये अडकलेला दगडी भराव दिपक चव्हाण यांच्या पाठपूरवठयामुळे करण्यात आला साफ

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड : महाड शहरातील कुंभार आळी, तांबड भुवन आणि आय. टी. आय. या परिसरात सावित्री नदीमधील भराव टाकण्यात आला होता मात्र जुलै महिन्यामध्ये आलेल्या पुरामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर तेथील भरावतील दगडी – गोठे त्या परिसरातील नाळ्यामध्ये अडकले होते.

नाळ्यामध्ये भराव अडकल्यामुळे त्या ठिकाणी पाणी व कचऱ्याचे प्रमाण वाढले होते हे जेव्हा मनसे महाड शहर उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी महाड नगरपालिकेकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आणि सातत्याने केलेल्या पाठपुव्याला यश मिळाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाड शहर उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांच्या प्रयत्नाने आणि पाठपूरवठयामुळे महाड नगरपालिकेकडून नाळ्यामधील भराव काढून साफ सफाई करण्यात आली.

त्या परिसरातील रहिवासी आणि सुदेश शिरशिवकर या नागरिकांनी दिपक चव्हाण यांना हे काम पालिकेकडून पूर्ण करून द्यावे या साठी विनंती केली होती, आणि ते काम पूर्ण झाल्याबद्दल मनसे महाड शहर उपाध्यक्ष दिपक चव्हाण अभिनंदन देखील करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!