सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी घेतली होती सुपारी
72 तास पूर्ण होन्यापूर्वीच आरोपींना जेरबंद करण्यास पोलिसांना यश
भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता हळूहळू माहिती समोर येऊ लागली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने झालेला गोळीबार हा सलमान खानला घाबरवण्यासाठीच करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांना सलमानला घाबरवण्यासाठी बिश्नोईकडून आरोपीना जबाबदारी देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सलमान खानच्या घरावर हल्लेखोरांनी 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने या घटनेचा तपास सुरू केला. या घटनेला 72 तास पूर्ण होण्याआधीच गुजरातमधील भूज येथून आरोपींना जेरबंद करण्यास पोलिसांना यश मिळाले. आरोपींना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी दोन मॅगझीन घरावर फायर करण्याचे टारगेट दोन्ही आरोपींना देण्यात आले होते. या हल्ल्यासाठी आरोपींना पैसेही देण्यात आली.
दोन्ही आरोपींना सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी एक लाख रुपये आगाऊ मिळाले होते. काम फत्ते झाल्यावर आरोपींनानंतर आणखी 4 लाख मिळणार होते. अशी एकूण चार लाख रुपयांची सुपारी आरोपींना हल्ल्यासाठी मिळाली असल्याचे चौकशीत समोर आले आहे.



