तालुका

नवयुवक मित्र मंडळ आणि मुंबई मंडळ सव उगवतीवाडी यांच्या माध्यमातून विद्यार्थि गुण गौरव सोहळा संपन्न 

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक 

महाड : महाड तालुक्यातील सव येथील नवयुवक मित्र मंडळ सव उगवतीवाडी आणि मुंबई मंडळ सव उगवतीवाडी यांच्या माध्यमातून विद्यार्थि गुण गौरव सोहळा संपन्न झाला.

गणपती सणाचे निम्मित साधून विद्यार्थि गुण गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या गुणगौरव सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांचा दप्तर, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये एस.एस.सी तर एच. एस. सी. परीक्षेत [ कला, विज्ञान, वाणिज्य ] विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता.

गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपापले अनुभव व्यक्त केले सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन पुढे मार्गक्रमण करा, नियमित अभ्यास करा हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन केले.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन व कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, ६० वर्षांवरील सभासदांचे देखील विशेष सत्कार या वेळी करण्यात आले.

मान्यवर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले, विद्यार्थि आणि ग्रामस्थ आणि सदस्यांनी मुंबई मंडळा चे आभार व्यक्त केले.

या वेळी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष रणजित भडवळकर, गावदेवी अध्यक्ष विलास राक्षे, माजी अध्यक्ष रामदास राक्षे, सल्लागार डॉक्टर रवींद्र शिंदे, गावदेवी मुंबई मंडळ अध्यक्ष विष्णू बटावले, महिला मंडळ अध्यक्ष रश्मी भडवलकर, माजी सव सरपंच अवंती शिंदे, मुंबई महिला सदस्या दिव्या शिंदे, नव युवक मित्र मंडळ मुंबई अध्यक्ष मयुर राक्षे, माजी अध्यक्ष प्रकाश शिंदे, दत्तेश कन्स्ट्रक्शन मालक महेन्द्र शिंदे, आदी मान्यवर, विद्यार्थि आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!