शहर

महाडमध्ये अनंत चतुर्दशीचा अभूतपूर्व उत्साह; ढोल-ताशांच्या गजरात आणि थाटामाटात बाप्पाला निरोप!

 

प्रदीप सोंडकर शहर प्रतिनिधी 

महाड : महाड शहरामध्ये अनंत चतुर्दशीचा सण अत्यंत उत्साही, थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या सांगता दिवशी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी संपूर्ण शहरात भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती.

ढोल-ताशांचा गजर, फडफडणाऱ्या भगव्या पताका आणि ठिकठिकाणी फुगड्या खेळत नाचणाऱ्या भाविकांच्या अभूतपूर्व उत्साहाने महाडचे रस्ते दुमदुमून गेले होते. पारंपारिक वेशभूषेत महिला आणि पुरुषांनी या विसर्जन मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अत्यंत आकर्षक रोषणाई आणि

सुगंधी फुलांनी सजवलेल्या विविध रथांमधून लाडक्या बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली.

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या तालावर भाविकांनी ठेका धरत बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण महाड शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे शहरातील सर्व विसर्जन मिरवणुका अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि मोठ्या उत्साहात पार पडल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!