तालुका

महाड एस.टी बस आणि डंपर मध्ये भीषण अपघात / यामध्ये 23 प्रवासी जखमी 

सचिन चादोरकर - जिल्हा प्रतिनिधी रायगड 

 

महाड : मुंबई गोवा महामार्गावर नाते खिंड येथे एस.टी बस आणि डंपर मध्ये अपघात झाला असून यामध्ये 23 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. हा अपघात आज 9 मे रोजी मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

मुंबई – महाबळेश्वर एस.टी बस आणि डंपर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. एसटी बस मुंबई वरून महाड मार्गाने महाबळेश्वर जात असताना आणि डंपर महाड वरून जात असताना दोघांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

या अपघातामध्ये डंपर चालक देखील जखमी झाला आहे, सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी महाड शहर पोलीस दाखल झाले असून अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!