ब्रेकिंग
शिवसेना खासदार संजय राऊत यांना मिळाला आज जामीन
तब्बल 100 दिवस आर्थर रोड जेलमध्ये राहिल्यानंतर आज बाहेर
भरत पवार – जिल्हा प्रतिनिधी पालघर
मुंबई: तब्बल 100 दिवस आर्थर रोड जेलमध्ये राहिल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला. जामिनावर बाहेर आल्यानंतर आपण पुन्हा लढणार असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केलंय. तसंच शिवसेनेचा कणा मोडला नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं ते म्हणाले.



