तालुका

महाडच्या सावित्री नदीचे पाणी झाले निळसर / रसायन मिश्रित पाणी असल्याचा संशय

मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा

 

सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड

महाड: दि. 28 जुलै महाड शहरालगत असणाऱ्या सावित्री नदीचे पाणी गेले चार दिवसांपासून निळसर रंगाचे झाले असल्याचे नागरिकांना पहायला मिळत आहे. हे पाणी रसायन मिश्रीत पाणी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शहराच्या भोईघाट परिसरातील सावित्री नदीचे पाणी गेल्या चार दिवसांपासून निळ्या रंगाचे झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. हेपाणी रसायन मिश्रीत असल्याची चर्चा नागरिक व्यक्त करीत असून हे रसायन मिश्रीत पाणी महाड एमआयडीसी मधून आले असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

दरम्यान या रसायन मिश्रीत पाण्याची दखल मनसेचे महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे, उपाध्यक्ष दीपक चव्हाण, मविसेचे तालुकाअध्यक्ष अथर्व देशमुखा, मनसैनिक स्वप्नील पार्टे यांनी घेवून या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकारी इंदिरा गायकवाड यांना भेटून संबंधीतांवर कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!