तालुका
पोलादपूर तालुक्यात ठाकरे गटाला धक्का / पैठण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील पैठण ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांसह आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमा ताई गोगावले, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभागप्रमुख सतीश शिंदे, विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या पक्षप्रवेश समारंभवेळी सुषमाताई गोगावले यांनी त्यांच्या शिवनेरी या निवासस्थानी प्रवेश कर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.



