म्हसळा नगरपंचायती मधील सदस्य पदांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात दि. 24 नोव्हेंबर 2021 पासून आचार संहिता लागू झाल्याचीघोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.
त्यानुसार रायगड जिल्ह्यातील म्हसळा, नगरपंचायतीमधील 1 ते 17 येथील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसंदर्भात जिल्हाधिकारीडॉ.महेंद्र कल्याणकर यांनी अधिकाऱ्यांच्या नेमणूका व तारखा निश्चित केल्या असून त्या पुढीलप्रमाणे :
म्हसळा नगरपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन श्री.अमित शेडगे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. मनोज उकिर्डे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध केलेल्या वेबसाईटवर भरण्या करिता उपलब्ध असण्याचा कालावधी– दि.1 डिसेंबर 2021 (बुधवार) सकाळी 11.00 ते दि.07 डिसेंबर 2021 (मंगळवार) दुपारी 2.00 पर्यंत.
नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी– बुधवार, दि.1 डिसेंबर 2021 ते मंगळवार, दि.07 डिसेंबर 2021 (दुपारी सकाळी 11.00 तेदुपारी 2.00 पर्यंत.), दि.4 डिसेंबर 2021 (शनिवार) व दि.05 डिसेंबर 2021 (रविवार) सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाही.
नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचे ठिकाण– तहसिल कार्यालय, म्हसळा, ता.म्हसळा, जि.रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननीची तारीख ववेळ– दि.08 डिसेंबर 2021 (बुधवार,सकाळी 11.00 वाजल्यापासून), नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व मागे घेण्याची जागा– तहसिल कार्यालय, म्हसळा, ता. म्हसळा, जि. रायगड, वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक– दि.8 डिसेंबर 2021 (बुधवार) छाननी संपल्यानंतर, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक (अपील नसेल तेथे)-दिनांक 13 डिसेंबर 2021 (सोमवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत, अपील असल्यास–वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशाकडे अपिल करता येईल, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत– अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक 16 डिसेंबर 2021 (गुरुवार) पर्यंत.
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमदेवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक– अपिल नसेलतेथे दिनांक 14 डिसेंबर 2021 तर अपिल असल्यास दिनांक 17 डिसेंबर 2021.
आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक– दिनांक 21 डिसेंबर 2021 (मंगळवार) सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत.
मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक– दिनांक 22 डिसेंबर 2021 (बुधवार) सकाळी 10.00 वाजल्यापासून, मतमोजणीचे ठिकाण–सार्वजनिक वाचनालय, नवानगर, म्हसळा, ता. म्हसळा, जि. रायगड.



