आरोग्य व शिक्षण

महिला विकास समितीच्या पुढाकाराने बारसगाव मध्ये कोविड- १९ चे १०० % लसीकरण

संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग

जगावर कोरोना चे सावट आले व सारे जग कोरोनामुळे थप्प झाले. महाड तालुक्यातील बारसगाव हे दीडशे पेक्षा जास्त घरांचे गाव यागावाची लोकसंख्या ६२३ आहे. कोरोनाचे सावट आपल्या गावावर पडू नये म्हणून सर्वजण प्रयत्न करत होते. या गावात स्वदेस फाउंडेशनयांच्या मार्गदर्शनाखाली गाव विकास समिती काम करीत आहे. विकासाची अनेक कामे या समिती मार्फत करण्यात आली आहेत, या समितीचे माजी अध्यक्ष तानाजी गायकवाड व सचिव दीपक झांजे यांच्या सूचनेनुसार समितीमध्ये बदल करण्यात आला, गावाच्या मतानेपूर्णपणे महिलांची समिती बनविण्यात आली. गाव विकासाचा आराखडा बनविला. विकासाचे पहिले पाऊल म्हणून महिला समितीनेगावामध्ये कोविड –१९ चे १००% लसीकरणाचा निर्णय घेतला.

नवनिर्वाचित गाव विकास समितीच्या अध्यक्षा स्वाती अनंत झांजे यांनी सर्व महिला सदस्यांना सोबत घेऊन गावाचे सर्वेक्षण केले. लसीकरणाची यादी तयार केली व कोविड लसीकरणाची जनजागृती सर्व गावांमध्ये केली. ज्या व्यक्ती लसीकरणासाठी तयार होत नव्हत्या त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून लसीकरण करण्यासाठी तयार करण्यात आले, अठरा वर्षाच्या पुढील एकूण ४०९ लोकांच्या घरोघरी जाऊन लसीकरणाला प्रवृत्त केले, तसेच नजीकचे प्राथमिक आरोग्य केंद्र वरंध मध्ये जाऊन गावात लसीकरणाचे शिबिरलावण्यासाठी विनंती करण्यात आली, सर्व गावाला एका शिबिरामध्ये लसी अभावी लसीकरण मिळणे शक्य नव्हते म्हणून ३ शिबिरे लावणे आवश्यक होते.

महिलांबरोबरच गावचे सरपंच कल्पना झांजे व उपसरपंच संतोष हनुमंत झांजे यांच्या सहकार्याने गावात जनजागृती करून शिबिराचेनियोजन केले. महिलांच्या नियोजनामुळे तीन वेळा शिबीर गावामध्ये उत्तम प्रकारे पार पडले या शिबिरामुळे गावात पहिल्या लसीकरणाचा डोस शंभर टक्के लोकांना मिळाला व दुसरा डोस ७०% लोकांना मिळाला. उरलेल्या ३० % लोकांच्या लसीकरणाचे नियोजन महिला समितीने केले आहे. सातत्याने पाठपुरावा करून १००% लसीकरण केल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी महिला गाव विकास समितीचे आभार मानले या शिबिरासाठी महीला समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा स्वाती अनंत झांजे व सचिव सारिका मंगेश झांजे व यासमितीचे सर्व सदस्या, गाव विकास समितीचे माजी अध्यक्ष तानाजी गायकवाड, सचिव दिपक झांजे, स्वदेस मित्र / आशा सेविका रेश्मागायकवाड, प्रथामिक आरोग्य केंद्र डॉ. पूनम चव्हाण, सुपरवायझर पावशे, आरोग्य सेविका संगीता मिंडे, आरोग्य सेवक रमाकांत सोमवंशी, बारसगाव शाळेचे मुख्याध्यापक संदीप तानाजी कदम व सहकारी स्वदेस फाउंडेशन चे वरिष्ठ समन्वयक सरिता गायकवाडआणि स्वदेस फाऊंडेशनचे उपसंचालक  प्रदीप साठे, व्यवस्थापक संकेत तांदळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!