देशमुख कांबळे येथे १ कोटी २८ लक्ष रुपये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते
माजी उपसरपंचा सह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
सचिन चांदोरकर – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : देशमुख कांबळे ग्रामपंचायत मध्ये १ कोटी २८ लक्ष रुपये मंजूर असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे कामाचा शुभारंभ कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.
यादरम्यान माजी उपसरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामधील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित जाहीर प्रवेश केला, प्रवेश कर्ते माजी उपसरपंच सुरेंद्र भोसले, मंगेश, कळमकर, दिलीप सुर्वे, शैलेश भोसले, नरेंद्र भोसले, भगवान वाघे, जितेंद्र भोसले, साहिल भोसले, इत्यादींनी शिवसेना या भागात करत असलेल्या विकास कामांना पाहून शिवसेनेत प्रवेश केला.
या वेळी महिला जिल्हा संघटिका नीलिमा घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय सावंत, जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, माजी सभापती सपना मालुसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अपर्णाताई घोसाळकर, महिला उपतालूका शितल देशमुख, नाते उपविभाग महिला संघटक सरोज देशमुख, संरपच सुनिल भाई देशमुख, युवा सेनेचे अंबवले, शेखर राखाडे, उप संरपच रुपेश हाटे, माजी संरपच अशोक बंधु देशमुख, मा सरपंच आप्पा देशमुख, मा संरपच अंनत देशमुख, मा संरपच राजेंद्र कळमकर, मा संरपच सुनिल जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विभाग प्रमुख राजू देशमुख, उपविभाग प्रमुख, शिव सेना शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, भागातील शिवसेना युवा सेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.



