तालुका

फौजी आंबवडे खिंडवाडी येथील काँग्रेस कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी केला बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

महाड : महाड विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायतचे वारे जोरात वाहू लागले असताना इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात येण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे, फौजी अंबवडे खिंडवाडी येथील काँग्रेस कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

प्रवेश कर्ते-ह.भ. प. केशव भाऊ पवार, जनार्दन भाऊ पवार, किशोरी केशव पवार, सावित्री जनार्दन पवार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत ढालकाठी येथील शिवनेरी निवासस्थानी विभागातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या पक्ष प्रवेश समारंभावेळी विन्हेरे विभागातील उपविभाग प्रमुख प्रभाकर गायकवाड, तालुका महिला संघटक प्रतिभा पवार, माजी सरपंच सखाराम पवार, दिगंबर पवार, दिलीप पवार, संतोष पवार, एकनाथ पवार, शाखाप्रमुख काशिनाथ पवार इत्यादींच्या उपस्थितीत सदर पक्षप्रवेश समारंभ संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!