आरोग्य व शिक्षण

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

माणगाव तालुका अध्यक्ष नितीन बडे यांच्या पुढाकारातून नाभिक समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

 

तालुका प्रतिनिधी माणगाव – नितीन बडे 

माणगाव : १५ ऑगस्ट शनिवार रोजी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आणि माणगाव तालुका अध्यक्ष नितीन बडे यांच्या पुढाकारातून माणगाव शहर व ग्रामीण विभागातील नाभिक समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

निलेश भगवान सांबरे हे महाराष्ट्रातील, विशेषतः पालघर, ठाणे आणि कोकण भागातील एक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती आणि ‘जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था’ चे संस्थापक आहेत. शिक्षण आणि समाजकारणातील त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे त्यांना ‘शिक्षण महर्षी’ म्हणून ओळखले जाते.

यावेळी रायगड जिल्हा पदाधिकारी सुरेश यादव, जयंत शिंदे, अनंत खराडे, कांता हुजरे, दिलीप जाधव, तालुका उपाध्यक्ष अजित हुजरे, तालुका सदस्य रुपेश गायकवाड, माणगाव शहर, विभाग अध्यक्ष दिपेश जाधव, माणगाव तालुका नाभिक तरुण समाज संघांचे उपाध्यक्ष विलास वसंत यादव, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विध्यार्थी, पालक आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!