तालुका

दिपक चव्हाण यांच्या वाढदिवसा निमीत्त शासन आपल्या दारी या अभियानाचे आयोजन

शाळेय विद्यार्थ्यांना वह्या देखील वाटप

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड : मनसे महाड शहर उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त शासन आपल्या दारी या अभियानाचे आयोजन महाड मधील कुंभार आळी, तांबड भुवन, भोई आळी आणि प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी राबविण्यात आला.

यावेळी आधारकार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, संजय गांधी निराधार अनुदान योजना, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, नविन मतदार नोंदणी, वृद्धापकाळ, दिव्यांग, राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना अश्या इ. विवीध शासकीय योजना या उपक्रमात राबवण्यात आल्या.

महाड मधील शाळा क्र. १, शाळा क्र. २, कुंभारआळी आणि तांबडभुवन परिसरातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या उपक्रमाला महाड मधील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या वेळी मनसे महाड मधील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!